वैजापूर

तालुक्यातील शिवराई येथील रहिवासी ओमकार संभाजी शिंदे (पाटील) याची भारतीय संरक्षण दलात अग्निवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. ओमकार याचे शालेय शिक्षण शिवराई येथील जिल्हा परिषद शाळेत झाले असून पुढे त्याने येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली आहे. त्याने अग्निवीरचे हे यश आपल्या बौद्धिक व शारीरिक मेहनतीच्या जोरावर संपादित केलेले आहे. १ जुलै  रोजी तो त्याच्या पुढील प्रशिक्षणासाठी साठी अहिल्यानगर मिल्ट्री कॅम्प ट्रेनिंग सेंटर येथे रवाना होणार आहे. त्याचे या यशाबद्दल पद्मिनीबाई शिंदे, संभाजी शिंदे, कल्पना शिंदे, ॲड. रविराज शिंदे, ॲड. वंदना शिंदे, आकांक्षा शिंदे, वैशाली मुळे, अद्वैतब्रह्म शिंदे, आर्यवर्धन शिंदे, डॉ. रोहन मुळे आदींनी अभिनंदन केले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.