लॉजवर नेऊन विवाहितेवर वारंवार अत्याचार : एकाविरुद्ध गुन्हा दाखल...



वैजापूर
नात्यातीलच तीस वर्षीय विवाहितेवर लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार करणाऱ्या एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
या बाबत पालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित तीस वर्षीय महिलेचे सन - २०११ मध्ये लग्न झालेले असून तिला दोन आपत्य आहेत.  तिचा चुलत मामाचा मुलगा हा नातेवाईकांचे काही कार्यक्रम असल्यास पीडितेला अधून-मधून भेटत. दरम्यान एके दिवशी तिच्या घरी कार्यक्रम असल्याने तो तिच्या घरी आला होता. सन - २०२० नंतर तो तिच्या घरी नेहमी जाणे येणे करु लागला. त्यानंतर ते दोघे फोनवर एकमेकांशी बोलु लागले. एका दिवशी पीडित महिलेच्या घरी कोणी नसतांना 'तो' तिच्या घरी आला व म्हणाला की, 'माझ्यासाठी लिंबु सरबत कर' तिनेही दोन सरबत करून आणले. या गडबडीत त्याने तिला पिण्यासाठी पाणी मागितले. ती पाणी आणण्यास आत गेली असता त्याने तिच्या सरबतमध्ये गुंगीचे औषध टाकून दिले. पीडितेने ते सरबत पिताच ती बेशुद्ध झाली. यानंतर तिला काहीच समजले नाही. यावेळी त्याने तिचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढले. त्यानंतर चार दिवसांनी तो पुन्हा तिच्या घरी आला.  त्याने काढलेले आक्षेपार्ह छायाचित्रे पीडितेला दाखवुन म्हटला की, 'हे फोटो मी तुझ्या पती, सासु व नातेवाईकांना दाखवितो' मात्र यावर महिलेने त्याला 'तुला काय पाहिजे?' अशी विचारणा केली. तेंव्हा त्याने 'तु माझ्या सोबत बाहेर चल' असे म्हणून तिला म्हैसमाळ येथील एका लॉजवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार अशीच धमकी देऊन त्याने तिच्यावर वेगवेगळ्या लॉजवर नेऊन वेळोवेळी अत्याचार केला. यानंतर छायाचित्र नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देत त्याने पीडितेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.  अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून  एके दिवशी महिलेने सर्व हकीकत तिच्या काकाला व इतर नातेवाईकांना सांगितली. त्यांनीही त्याला समजविले मात्र त्याच्या वागण्यात काही एक फरक पडला नाही. अखेर पीडितेने वैजापूर पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.