इंस्टाग्रामवर प्रक्षोभक व्हिडिओ : एकाविरुद्ध गुन्हा दाखल...


वैजापूर

बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इंस्टाग्रामवर प्रक्षोभक भाषण अपलोड करणाऱ्या एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश अनिल जगताप (रा.खंडाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी चिखला येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलिस 'सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी' वर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. अशातच २३ फेब्रुवारी रोजी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील उमेश अनिल जगताप याने त्याचे इंस्टाग्राम आयडीवरून त्याचा स्वतः चा प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमुळे त्याने दोन गटांमध्ये शत्रुत्वाच्या द्वेषाच्या भावना वाढविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.  पोलिसांनी घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना कळविली. याप्रकरणी गोपनीय शाखेचे अंमलदार ज्ञानेश्वर भागचंद मेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिसांत उमेश जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलिस परिसरातील समाजकंटकांच्या हालचालींवर, सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेऊन असून इंस्टाग्राम, व्हाट्स अप, फेसबुक या व इतर समाजमाध्यमांवर कुणीही  चुकीचे संदेश, प्रक्षोभक भाषणं, व्हिडिओ, रील्स, पोस्ट करू नयेत अन्यथा संभधिताविरुद्ध पोलिसांकडून प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी दिला आहे.