कोपरगाव

तालुक्यातील तळेगाव मळे येथे नुकतेच हिंदू धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्या दरम्यान एकूण २५ जोडप्यांचे लग्न समारंभ पार पडला.

तळेगाव मळे येथील अवधूत चिंतन देवस्थानाच्या पुढाकाराने १९ एप्रिल रोजी आयोजित  हिंदू धर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडप्यांचे हिंदू धार्मिक पद्धतीने विधीवत विवाह संपन्न झाला. विवाह सोहळ्यात सुमारे २५ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान  या जोडप्यांत वैजापूर तालुक्यातील १९ जोडप्यांचा समावेश होता. वैजापूर शहरातील सराफा व्यापारी नंदकुमार संचेती परिवाराच्यावतीने २५ जोडप्यांचे  मनी मंगळसूत्रे जोडयांचे सहकार्य करण्यात आले. याशिवाय इतर मान्यवर व पंचक्रोशीतील नागरिकांनी अन्नदानासाठी सहकार्य केले. या विवाह सोहळ्याला वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, छञपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, नगरसेवक विशाल संचेती, विनोद राजपूत, अल्पेश संचेती, यांच्यासह राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.