धरणात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या ..

वैजापूर

धरणग्रस्तनगर परिसरातील एका तरुणाने शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. रोहित विलास काटे (रा.वैजापूर) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित काटे हा वैजापूर शहरातील धरणग्रस्त नगर परिसरात रहिवसास होता. शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास नारंगी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. रोहित हा अविवाहित होता. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सकाळी साडे दहा वाजेपूर्वी त्याने नारंगी धरणात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक रामचंद्र जाधव हे करीत आहेत.