वैजापूर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व 'बालिका दिन' जिल्हा परिषद प्रशाला शिवराई येथे शनिवार (०३) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमा पूजनाने झाली.
या प्रसंगी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची हुबेहूब वेशभूषा साकारली होती तर ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा पी. ए. कळसकर यांनी मुलींना "शिक्षणरूपी दागिना अंगिकारून स्वावलंबी बना" असा मोलाचा संदेश दिला. मुख्याध्यापक ई. बी. गवळी यांनी सावित्रीबाईंच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविकात भाग्यश्री मुठे यांनी सावित्रीबाईंच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती दिली. तसेच एस. के. तुंबारे, एस. टी. भुजाडे, राहुल ए. कळंके आणि बी. टी. वानखडे या शिक्षकांनी स्त्री सक्षमीकरण, उच्च शिक्षण आणि सामाजिक जडणघडण या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक ई. बी. गवळी, आर. झेड. परदेशी, आर. एस. पगारे, एस. के. तुंबारे, एस. एन. बलीकोंडवार, जी. बी. गायके, राहुल ए. कळंके, पी. ए. कळसकर, एस. टी. भुजाडे, बी. टी. वानखडे, वाय. डी. जेजुरकर, बी. ए. मुठे, बी. आर. पवार आणि आर. ए. कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.


.jpg)
Social Plugin