वैजापूर
तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी फैसल पटेल, उपाध्यक्षपदी बाबासाहेब धुमाळ, किशोर साळुंके तर सचिवपदी मन्सूरअली सय्यद यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मंगळवार (ता.०६) रोजी दर्पण दिनानिमित्त येथील पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. याच कार्यक्रमात वैजापूर तालूका पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अमोल राजपूत यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची नावे सुचविली. त्यास विजय गायकवाड, काकासाहेब लव्हाळे, मोबीन खान, नितीन थोरात यांनी अनुमोदन दिले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्र्यावर पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अन्य कार्यकारिणी अशी - सहसचिव- दीपक बरकसे, राहुल त्रिभुवन, कार्याध्यक्ष- आवेज खान, कोषाध्यक्ष विलास म्हस्के, सहकोषाध्यक्ष - सुयोग वाणी, तालुका समन्वयक - विशाल त्रिभुवन, शुभम लूटे, जिल्हा समन्वयक- किरण राजपूत, गौरव धामणे, मार्गदर्शक - विजय गायकवाड, भानुदास धामणे, जफर खान, प्रशांत त्रिभुवन, शैलेश खैरमोडे, मकरंद कुलकर्णी, काकासाहेब लव्हाळे, मोबीन खान, अमोल राजपूत, नितीन थोरात, दीपक थोरे, डॉ. हरिभाऊ साबणे, रियाज शेख, सदस्य - विवेक निंबाळकर, संजय पगारे, आबासाहेब कसबे, जीवन पठारे, विजय जाधव, कमलाकर रासणे, बाबासाहेब वाघ, संतोष मोरे, संतोष कुमांडे, सुनील शिरोडे, प्रवीण भाडईत, किशोर पैठणपगारे, सौरभ जाधव, अजय राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी शहर व ग्रामीण परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
.jpg)

.jpg)
Social Plugin