वैजापूर
येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठाणच्या वतीने रविवार (ता.३१)रोजी विविध उपक्रम घेऊन अहिल्यादेवी होळकर यांना शहरातील नागरिकांनी एकत्र येत अभिवादन केले.
सकाळी दहा वाजता अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष रियाज शेख, अकिल शेख यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी रक्तदान शिबाराचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, श्रीराम गायकवाड, नगरसेवक पारस घाटे, अमीर अली, शैलेश चव्हाण, लिमेश वाणी, गोकुळ भुजबळ, सामजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, सचिन जोशी, शैलेश पोंदे, सुनीता साखरे, मंजुषा ढाकरे आदींची उपस्थित होते.



Social Plugin