वैजापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून वैजापूर तालुक्याचा एकूण निकाल ८६.७० टक्के लागला आहे. यंदा तालुक्यातील ६८ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
तालुक्यातून दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये २ हजार ६१७ मुलांचा तर २ हजार १२६ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्ष परीक्षेला ४ हजार ६०० विद्यार्थी उपस्थित राहिले. त्यामध्ये २ हजार ५९५ मुले व २ हजार ११५ मुली होत्या. दरम्यान निकालात एकूण ४ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये २ हजार १३१ मुलांचा तर १ हजार ९५३ मुलींचा समावेश आहे. मागील वर्षी वैजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल ९४.९० टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात घट झाल्याचे दिसून येत आहे. तरीही अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याच्या शैक्षणिक परंपरेत भर घातली आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Social Plugin