वैजापूर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व वैजापूर शहरातील हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानल्या जाणारे नौगाजी बाबा उर्स शरीफ हे दोन्ही उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करा असे आवाहन पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी ०९ एप्रिल रोजी शांतता कमिटी बैठकी दरम्यान बोलताना केले.  १४ एप्रिल रोजीचा उत्सव व १५ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या नौगाजी बाबा उर्स शरीफच्या पार्श्वभूमीवर येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

या वेळी बोलताना पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले म्हणाले की,  हे दोन्ही उत्सव शांतता व बंधुभावात साजरे करून शहरात  बंधुत्वाचा संदेशासह कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी या साठी सर्वांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. मात्र उत्सव काळात  असामाजिक तत्वांनी शांतता व सुव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला तर अशां विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. गत काळातील काही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यामातून पोलिसांची असामाजिक तत्वावर करडी नजर राहणार आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. बैठकी दरम्यान उपस्थित शांतता कमिटी सदस्यांनी पोलिस प्रशासनाला काही सूचना देखील केल्या. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, काझी हाफीजुद्दीन, प्रकाश बोथरा, विनोद राजपूत, ऐराज शेख, निलेश पारख, विजय त्रिभुवन, हाफिज काकर, जयमाला वाघ, सुप्रिया व्यवहारे, अंजली जोशी,मंजुषा ढाकरे, धोंडिरामसिंग राजपूत, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे,रणजीत चव्हाण, पोहेकॉ योगेश झाल्टे, अमोल कांबळे, प्रशांत गीते यांच्यासह शांतता कमिटी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.