वैजापूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष हाजी अकील (सेठ) यांच्या पत्नी तथा उपनगराध्यक्ष रियाज शेख यांच्या मातोश्री नौशाद बी यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने (ता.११) रोजी निधन झाले.
मागील काही दिवसांपासून नौशाद बी यांच्यावर छञपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रदीर्घ आजाराशी झुंज देत शनिवारी दुपारी तीन वाजता
उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. नौशाद बी या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जात. वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष हाजी अकील (सेठ) यांच्या त्या पत्नी तर विद्यमान उपनगराध्यक्ष रियाज शेख यांच्या त्या आई होत. शनिवारी रात्री नऊ वाजता नौगाजी बाबा दर्गा परिसरातील कब्रस्थानमध्ये त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे.

Social Plugin