वैजापूर
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यासह प्रतिमेस आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शनिवारी महात्मा फुले स्मारक परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमा दरम्यान वैष्णवी देवकर या मुलीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर बँड पथकाने देशभक्तीपर व सामाजिक गीते सादर केली. याशिवाय शिव-फुले-शाहु-आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड, नगरसेवक विशाल संचेती, पारस घाटे, स्वनिल जेजुरकर, पुंडलिक गायकवाड, डॉ.प्रीती भोपळे, सुप्रिया व्यवहारे,सुनीता साखरे, कमलेश आंबेकर, धोंडिरामसिंग राजपूत, गिरीश चापनेरकर यांच्यासह शहरातील नागरिक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Social Plugin