वैजापूर
शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करत २८ जणांवर दंडात्मक कारवाई केली. ०६ एप्रिल रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि एचडीएफसी बँक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली.
रस्त्याच्या मधोमध वाहन उभी करणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, तसेच विना लायसन्स वाहन चालविणे अशा विविध प्रकारच्या नियमभंग करणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांनी पकडले. या कारवाईत एकूण २८ वाहनचालकांकडून तब्बल ३५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे पोहेकॉ अविनाश भास्कर, प्रल्हाद जटाळे आणि वाल्मिक बनगे यांच्या पथकाने केली. दरम्यान शहरातील पोस्ट ऑफिस परिसरात रात्रीच्या वेळी राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध वाहन उभी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून या भागातही अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.



Social Plugin