वैजापूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा येथील पंचायत समिती सभागृहात ०६ एप्रिल रोजी स्वागत व सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. 
या वेळी बोलताना नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांनी भविष्यातही ९० टक्के समाजकारण व १० टक्केच राजकारण करा असा सल्ला देत पूर्वीपासून करत आलेल्या जनहिताच्या कामांना प्राधान्य द्या असा सल्ला निवडणुकीत विजयी उमेदवारांना दिला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, उपनगराध्यक्ष रियाज शेख, बाजार समितीचे सभापती कल्याण दांगोडे यांच्यासह नवनियुक्त जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,
नगरसेवक व पक्षपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.