वैजापूर 

तालुक्यातील पालखेड केंद्रांतर्गत असलेल्या गोळवाडी जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक अशोक सोनवणे हे सीबीएसई बोर्डाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पेपर १ व २ प्रथम श्रेणीत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. 
ही परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक केलेली आहे. शिक्षक सोनवणे हे केंद्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल पालखेड केंद्राचे केंद्रप्रमुख राधाकिसन सांबरे, केंद्रीय मुख्याध्यापक रामेश्वर राऊत, गोळवाडी जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला डिके यांच्यासह सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी  अशोक सोनवणे यांनी पालखेड केंद्रातील सर्व शिक्षकांना यापुढील काळात केंद्रीय पात्रता परीक्षेविषयी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. या वेळी शिक्षक ज्ञानेश्वर भोसले, सकाहारी नवले, केशव चव्हाण, राजू डिके, किरण घोडके, उद्धव शेळके, ज्ञानेश्वर गिरगुणे, आत्माराम चव्हाण, शोभा माहुरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.