वैजापूर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैजापूर शहरातील त्यांच्या स्मारक परिसरात मंगळवार (ता. १४ ) रोजी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत सामूहिक मानवंदना अर्पण केली.
यावेळी स्मारक परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समतेचा संदेश दिला. या प्रसंगी आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी तसेच माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या प्रसंगी उपस्थितांच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक विशाल संचेती, राजेश गायकवाड, प्रशांत कंगले, डॉ.व्ही.जी,शिंदे, तहसिलदार सुनील सावंत, सुप्रिया व्यवहारे, सुनीता साखरे, धोंडिरामसिंह राजपूत, संतोष त्रिभुवन, सोनू राजपूत, दिनेश राजपूत, डॉ. संतोष गंगवाल यांच्यासह नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. याशिवाय शहरातील आंबेडकरनगर,रमाई चौक,जेतवन बुद्ध विहारात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.




Social Plugin