वैजापूर
तालुक्यातील कोल्ही घाटात बुधवारी दूपारच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्ही येथील रहिवासी प्रदीप परसराम मगर (वय ४७) हे हे दुचाकीने ( एमएच १५ जीआर ७६५८) कोल्हीहुन वैजापूरच्या दिशेने जात होते. दरम्यान कोल्ही घाटात एक इको वाहन रस्त्यात बंद पडलेले होते. अचानक समोर आलेल्या या वाहनाला मगर यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्याच अवस्थेत त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मृत प्रदीप मगर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पूढील तपास पोलीस हवालदार किशोर आघाडे करीत आहेत.

Social Plugin