वैजापूर

महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे ता. १७ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.  शिबिराचे उद्घाटन आमदार रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश  गलांडे, तहसीलदार सुनील सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित प्रकरणे, दाखले, जमीन नोंदी, वारसा नोंद, फेरफार, सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसह विविध अडचणी ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यात आले. अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या शिबिराचा महालगाव मंडळातील भगुर, गाढेपिंपळगाव, पानवी (बु), वक्ती, माळी घोगरगाव, एकोडी सागज, जातेगाव टेंभी, कौटगाव, माळी सागज, बल्लाळी सागज या गावांतील एकूण एक हजार ८० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे, डॉ. प्रकाश शेळके, पंचायत समिती सदस्या.शीतल राहुल आल्हाट, देविदास सामसे, सरपंच रोहिणी नानासाहेब काळे, उपसरपंच रुपाली संपत जाधव, मंगेश गायकवाड, नायब तहसीलदार सुरज कुमावत, प्रविण काकडे, मंडळ अधिकारी दीपक कराळे,  कृषी अधिकारी व्ही. एस ठक्के, ग्राम पंचायत अधिकारी विजय वांढेकर, अब्दुल शेख तसेच  महसूल मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.