वैजापूर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त १० मार्च रोजी येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक परिसरात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला संत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अर्धसैनिक बलाचे सचिव गौतम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेच त्यांना ‘क्रांतीज्योती’ व ‘ज्ञानज्योती’ म्हणून ओळखले जाते. या कार्यक्रमास सजनराव गायकवाड, आबासाहेब जेजुरकर, ठेंगडे सर, अशोक देवकर, अशोक निकम, दिलीप निकम, भोला राजपूत, प्रकाश मेमाने, सीताबाई गायकवाड, सुमनबाई गायकवाड, उज्वलाबाई गायकवाड, माजी नगरसेविका माजी नगरसेविका माधुरी बनकर, प्रीती भोपळे, सुप्रिया व्यवहारे, सुनंदा माळी सुनीता साखरे, विशा गोरक्ष, संगीता ठोंबरे, अनिता दाने, स्वाती देशमुख, संगीता घोगरे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Social Plugin