पिक-अपच्या धडकेत चिमुकला ठार...

वैजापूर

भरधाव पिक-अपने धडक दिल्याने चिमुकला ठार झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील पुरणगाव शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.श्रेयांश अमोल ठोंबरे (२ वर्षे, रा. पुरणगाव) असे घटनेत ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रेयांश हा पुरणगाव येथील त्याच्या घरासमोर खेळत होता. दरम्यान तो रस्ता ओलांडत असताना भरधाव पिक-अप वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी तातडीने श्रेयांशला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु सायंकाळी डेपाच वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्रेयांशला तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर धडक देणारे वाहन व चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिकअपचालकाविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.