परप्रांतीय तरुणाचे अपहरण : २४ तासात अपहरणकर्ते जेरबंद...


वैजापूर

खंडणीसाठी तिघांनी एका परप्रांतीय तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत ऐवज लुटल्याची घटना बुधवारी सायंकाळी शहरातील बोथरा पेट्रोल पंपासमोर घडली. इम्रान अलीम अन्सारी असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून तो मुळचा बिहार राज्यातील भोजपुर जिल्ह्यातील बसाउरी येथील रहिवासी आहे. मात्र रोजगारासाठी तो वैजापूर येथे राहत आहे. त्याने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान घटना घडतात पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तपासचक्र फिरवत दोघांना ताब्यात घेण्यात आले. शिवम सुरडकर (रा.बर्डी मस्जिद परिसर) व सचिन गोरे (रा.स्मशान भूमी परिसर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

 

 पोलिसांनी घटनेत वापरलेल्या मुद्देमाला दोघांना जेरबंद केले.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान अन्सारी हा तरुण वैजापूर शहरातील एका बांधकाम प्रकल्पावर काम करत आहे. बुधवारी सायंकाळी तो लाडगाव रोड लगत असलेल्या मच्छी बाजारात मासे आण्यासाठी गेला होता. नेमकी याचवेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्याचे अपहरण केले. त्याला त्यांनी एका निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोकड व इतर ऐवज हिसकावून घेतला. इतक्यावरच न थांबता त्यांनी तरुणाला घरी फोन लावून पैसे मगाव अशी धमकी देत फोनद्वारे पैशाची मागणी केली. मात्र थोडया वेळानंतर तरुणाला त्यांनी सोडून दिले. याप्रकरणी तरुण इम्रान अन्सारी याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी तात्काळ तपासचक्र फिरविले. अवघ्या काही तासातच पोलिसांनी दोघा संशयिताना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी त्यांची नावे शिवम सुरडकर व सचिन गोरे असे असल्याचे सांगितले.हा गुन्हा अन्य एका जोडीदारासह केल्याची कबुली त्यांनी दिली. दरम्यान त्यांचा तिसऱ्या जोडीदाराचे नाव सचिन पवार (रा.खंडोबानगर) असल्याचे त्यांनी सांगितले. लगेचच पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व इतर साहित्य जप्त केले.