वैजापूरात तरुणांसाठी दोन दिवसीय व्यवसाय समुपदेशन व उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा
वैजापूर
केसरिया प्रतिष्ठान (वैजापूर) यांच्या विद्यमाने शहरातील सूरज लॉन्स येथे नुकतेच दोन दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन केसरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नितेश शहा व सचिव ॲड.महेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
२१ व २२ मार्च रोजी या कार्यशाळेचे करण्यात आले. व्यवसायातील टप्पे व यशस्वी उद्योजक होण्याच्या दृष्टीने शबरी फूडचे सॉफ्ट स्कील ट्रेनर प्रमोद चव्हाण व मंगेश नाईकवाडी यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना शेती निगडित व्यवसाय व त्यासाठीचे प्रशिक्षण, फायदे व बाजारातील मागणी या बाबत सखोल असे मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले. याशिवाय अधिक माहितीसाठी पोर्टल लिंक व संपर्क क्रमांक याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेसाठी शबरी फूड प्रोसेसिंगचे सर्व संचालक तथा केसरिया प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी १५० पेक्षा अधिक तरुणांनी आपला सहभाग नोंदवत मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले. दरम्यान उपस्थित तरुणांसाठी प्रकल्प शैक्षणिक साहित्य, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यशाळा समारोप प्रसंगी शबरी फूडचे तज्ञ संचालक विजय भालेराव यांनी आभारप्रदर्शन केले.



Social Plugin