वैजापूर

जगात सुख-शांती नांदावी, युद्धाचे संकट दूर व्हावे आणि मानवामध्ये बंधुभाव वाढावा अशी प्रार्थना करत वैजापूर शहरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या २१ मार्च उत्साहात साजरी करण्यात आली.

ईद निमित्त शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली.  नमाजानंतर उपस्थितांनी एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा  संदेश दिला. या प्रसंगी  काझी हाफीजोद्दीन, मस्जिदचे नादीम व इमाम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला आमदार  रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी,जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे,  उपनगराध्यक्ष रियाज शेख, सेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, नगरसेवक विशाल संचेती, पारस घाटे, दशरथ बनकर, विनोद राजपूत,शैलेश चव्हाण, स्वप्नील जेजुरकर,दिनेश राजपूत, उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, मुख्याधिकारी भागवत बिघोत, तहसिलदार सुनील सावंत, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, धोंडिरामसिंग राजपूत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य दृढ केले. दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागातही रमजान ईद शांततेत साजरी झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.