युविका राजपूत हिची दैदिप्यमान कामगिरी...

वैजापूर 

येथील रहिवासी संतोष धोंडीरामसिंह राजपूत यांची मुलगी युविका राजपूत हीने आय.आय.टी.मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या जानेवारी-२०२६ च्या राष्ट्रीय पातळीवरील डिझाईन आय.आय.टी प्रवेश परीक्षेत खुल्या प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर १५ वी रैंक प्राप्त करून ही अत्यंत स्पर्धात्मक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. या राष्ट्रीय  प्रवेश परीक्षेला देशभरातून वीस हजार विद्यार्थी बसले होते.या अभ्यासक्रमासाठी देशात आय.आय.टी कॉलेजमध्ये फक्त २४५ जागाच आहेत. या प्रवेश परीक्षेत डिझाईन, निरीक्षण, तार्किक व समस्या निवारण क्षमता इत्यादी निकषासह बुद्धीमत्ता व सामान्यज्ञान अशा विविध विषयांवर आधारित ही स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा असते. युविकाच्या या राष्ट्रीय पातळीवर यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडिरामसिंह राजपूत यांची युविका नात आहे.