वैजापूर
भगवान महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त वैजापूर शहरात रक्तदान शिबिरासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी शोभा यात्रेचे देखील आयोजन करण्यात आले. मंगळवारी सकाळी आठ वाजता येथील महात्मा गांधी मैदानावर जैन बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. भगवान महावीरजी की जय,अहिंसा परमोधर्म की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यानंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा प.पू. श्री तारक ऋषीजी व प.पू. श्री तीर्थतिलक महाराज यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आली. मंगल वाद्यांच्या सुरावटीत निघालेल्या या यात्रेद्वारे अहिंसेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यात आला. शोभायात्रेत मर्चंट बँकचे चेअरमन बाळासाहेब संचेती, शोभाचंद संचेती, प्रकाशचंद बोथरा, बाबुलाल संचेती, रिखबचंद संचेती, मिश्रीलाल हिरण, संतोष संचेती, शामसुंदर सारडा, हेमंतकुमार संचेती, नंदलाल मुगदिया, महेंद्र लोढा, जीवनलाल पारख, प्रफुल्ल संचेती, निलेश पारख, सागर संचेती, विजयकुमार कासलीवाल, डॉ.संतोष गंगवाल, राजेंद्र संचेती, विनोद छाजेड, संतोष लोढा, महेंद्र बेदमुथा, परिश कोठारी, डॉ.मोहीत बोरा,रुपेश संचेती, प्रवीण संचेती, गणेश बागमार, दर्शन संचेती, विनय संचेती, उमेश संचेती,अशोक कोठारी, रविंद्र संचेती, डॉ.धरमचंद जैन, आकाश बांठीया, संजय संकलेचा, अनिल हिरण, दिपक लोढा,संतोष बोथरा, धोंडिरामसिंह राजपूत, अशोक पवार (खंडाळकर) संचेती, राजू संचेती व सुभाष बोरा यांच्यासह सकल जैन समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा समारोप जैन स्थानक येथे ऋषीजींच्या अमृतवचनांनी झाला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह रक्तदान शिबाराचे देखील आयोजन करण्यात आले होते.




Social Plugin