वैजापूर 

शहरासह परिसरात रामजन्मत्सोव मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. २६ मार्च रोजी येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिरात  'सियावर रामचंद्र की जय, रामभक्त हनुमान की जय' च्या गजरात दुपारी बारा वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. 

नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी व माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते प्रभू सीता-राम यांचे मूर्तीचे विधीवत पूजन कऱण्यात आले. शहरातील संकट मोचन हनुमान मंदिर, ब्रह्मचारी मारुती मंदिर व इतर मंदिरात रामजन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. येथील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात भाविकांनी रांगा लावून दर्शन व प्रसाद घेतला. यावेळी नगरसेवक साबेरखान,अकिल शेख,जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड, नगरसेवक पारस घाटे,भगवान तांबे,उल्हास ठोंबरे, सौरभ संचेती, सीताराम व्यवहारे, धोंडीरामसिंह राजपूत, उत्सव समितीचे सुरेश  तांबे,सतीश कुलकर्णी, विनायक व्यवहारे,प्रकाश व्यास,राजू व्यवहारे,अशोक शिंदे,संतोष पवार,अतुल बसवेकर,शशिकांत पवार,जितेंद्र कासलीवाल,बद्रीनाथ तांबे,अशोक  पैठणे ,राजू मालपाणी, पारस बोहरा यांच्यासह व्यापारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.