कृषी विभागाच्या वतीने खंडाळा येथे प्रशिक्षण वर्ग संपन्न...

वैजापूर

आज तालुका कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र गांधीली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय खंडाळा येथे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.


 प्रशिक्षणाचे प्रस्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी केले. या प्रशिक्षणास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपसंशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून पिकाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने जमिनीचे आरोग्य सदृढ व सक्षम राहण्यासाठी जैविक,सेंद्रिय,विद्राव्य, हिरवळीचे,सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर करून जमीन सदृढ ठेवावी. जेणेकरून पिकांवर येणारे रोग व  व इतर समस्या कमी होतील. जेणेकरून पिकं सुदृढ होऊन उत्पादनात वाढ होईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच मोसंबी ,डाळिंब ,आंबा ,आद्रक मधील लागवड तंत्रज्ञान विषयी प्रश्नउत्तर स्वरूपात संवाद साधून शेतकऱ्यांचे शंकांचे निरसन केले. एनआरपीचे शास्त्रज्ञ डॉ. सूर्यकांत पवार यांनी तृणधान्य, कडधान्य गळीत धान्य पीक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले गळीत धान्य उत्पादक शेतकरी मधुकरराव घुगे यांनी आपल्या शेतातील गळीत धान्य पिकाचे लागवड तंत्रज्ञान विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .महिला उद्योजक लक्ष्मीबाई खंडागळे यांनी आपल्या आरोग्यासाठी शेतीत पिकणारी गळीत धान्यापासून तेल घाण्यातून तयार झालेले तेलाचा वापर करावा व शेतकऱ्यांनी भुईमूग ,करडई ,सूर्यफूल, तीळ ,कारळे यांची लागवड करण्याची आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी व्यंकट  ठक्के यांनी केले व आभार मंडळ कृषी अधिकारी श्याम पाटील यांनी मानले. या कार्यक्रमासाठी केवीके गांधीलीचे प्रमुख डॉ. सुखासे,उपप्राचार्य चोपडे ,मंडळ कृषी अधिकारी मोहनीराज मोरे,माधव गांगुर्डे, भाऊसाहेब खेमनार,रवी उराडे, उपकृषी अधिकारी विलास येवले ,किरण भुजबळ,विशाल दांगोडे, दत्ता पेदे ,आदिनाथ सपाटे ,ज्ञानेश्वर कोल्हे ,राजेंद्र थोरात कृष्णा सरोवर, प्रशांत राजवळ सह सर्व सहाय्यक कृषी अधिकारी महिला बचत गटाचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.