वैजापूर
येथील राजपूत समाजाचे जेष्ठ सदस्य माणिकसिंह किसनसिंह राजपूत यांचे रविवारी रात्री साडे दहा वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. सोमवारी दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू समयी त्यांचे वय ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Social Plugin