जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज..


वैजापूर 
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. तालुक्यात एकूण ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण असून, एकूण मतदारसंख्या २ लाख २४ हजार ३८८ आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २८१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ११२४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान सुरक्षेसाठी १८ पोलिस अधिकारी, २७६ पोलिस अंमलदार, ३८० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव दलाची ३ पथके असा जंबो फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या असून, संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णयधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांच्याकडून देण्यात आली आहे.