वैजापूरात शिवजयंती उत्साहात साजरी...

वैजापूर 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैजापूर शहर व तालुक्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. गुरुवारी सकाळपासूनच शहरात शिवभक्तांची गर्दी दिसून आली. दरम्यान आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी व इतर मान्यवरानी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरातील प्रमुख चौक, शाळा, महाविद्यालये, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  



शिवगर्जना, लेझीम, पोवाडे आणि शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. या प्रसंगी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घेऊन समाजात एकता, शिस्त व राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करण्याचे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले. सायंकाळी आयोजित शिकजयंती सोहळ्यादरम्यान  पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.