वैजापूर
तरुणाने शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. १४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खुशाल रविंद्र गायकवाड (२०, रा.वैजापूर) असे घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे.
खुशाल गायकवाड हा शहरातील धरणग्रस्तनगर परिसरातील रहिवासी होता. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. दरम्यान शनिवारी सकाळी तो घराबाहेर पडला. यानंतर त्याची दुचाकी नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात उभी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. मात्र तो तिथे मिळून आला नाही. यावेळी प्रकल्पाच्या पाण्यात त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू असताना त्याचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेतील मृत खुशाल हा शहरातील हॉटेल व्यावसायिक रविंद्र गायकवाड यांचा मुलगा होता.

Social Plugin