वैजापूर
शनिवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी ९ फेब्रुवारी रोजी येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात पार पडली. या निवडणुकीत शिवसेना हा सर्वाधिक जागा पटकविणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. जिल्हा परिषदेत एका पुरस्कृत उमेदवारासह एकूण ४ जागांवर तर पंचायत समितीत एका पुरस्कृत उमेदवारासह ८ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली . दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या बोरसर गटातून निवडणूक आखाड्यात उतरलेले माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पुत्र अजय चिकटगावकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
या निवडणुकीत वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेत सेने खालोखाल उबाठा २, भाजप १, राष्ट्रवादी काँग्रेस १ या पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. याशिवाय पंचायत समितीत शिवसेनेने एका पुरस्कृत उमेदवारासह ८ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४, भाजप २, उबाठा १, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
(शरदचंद्र पवार) एका उमेदवाराने विजय मिळवला.
पंचायत समितीच्या सभापती पदासाठी चुरस !!
वैजापूर पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव असून सवंदगाव गणात शिवसेनेच्या वंदना शिंदे तर महालगाव गणातून भारतीय जनता पक्षाच्या शीतल आल्हाट या निवडून आल्या आहेत. दरम्यान या निवडणुकीत एकूण १६ जागांपैकी शिवसेनेच्या एका पुरस्कृत उमेदवारासह सर्वाधिक ८ उमेदवारांनी मैदान मारले. मात्र तरी देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप व उबाठा या पक्षांचे विजयी उमेदवार एका छताखाली आल्यास सेनेला सभापती पद काबीज करण्यासाठी काहीशी कसरत करावी लागणार असल्याचे देखील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
वाकला गट : पार्वताबाई रामहरी जाधव (अपक्ष, शिवसेना पुरस्कृत) - ८२३६
१) वाकला गण : परिगाबाई पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार) - ४४०७
२) पोखरी गण : राधिका ठुबे (अपक्ष, शिवसेना पुरस्कृत ) - ४७९०
बोरसर गट : कल्याण (मनोज) गायके (उबाठा) - ११५०३
१) बोरसर गण : मीनाक्षी पवार (शिवसेना) - ४२७८
२) मनूर गण : राजीव साळुंके (शिवसेना) - ५८३२
शिऊर गट : संजय पाटील निकम (उबाठा) - ११०५०
१) शिऊर गण : सोनाली जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार) - ३५१५
२) खंडाळा गण : हुसेन शहाबुद्दीन शेख (उबाठा) - ३२८७
सवंदगाव गट : नीताबाई दीपक राजपूत (शिवसेना) - ९१५७
१) सवंदगाव गण : वंदना शिंदे (शिवसेना) - ५४२२
२) जरुळ गण : सुनील कदम (शिवसेना) - ४३४२
लासुरगाव गट : संगीता सुभाष तांबे (शिवसेना) - १०६५५
१) लासुर गण : अर्चना शेलार (शिवसेना) - ४७९७
२) पालखेड गण : राहुल शेळके (शिवसेना) - ६२७८
घायगाव गट : श्रीराम गायकवाड (शिवसेना) - ११३४३
१) घायगाव गण : भगवान साठे (शिवसेना) - ५२३७
२) लाडगाव गण : राहुल लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,अजित पवार) - ४८४३
वांजरगाव गट : पंकज ठोंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार) - ११२०६
१) वांजरगाव गण : मिनाबाई धोर्डे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार) - ५४५६
२) वीरगाव गण : कांता बारसे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार) - ५२१६
महालगाव गट : अविनाश गलांडे (भाजप) - १२००२
१) महालगाव गण : शीतल आल्हाट (भाजप) - ४९९६
२) नागमठाण गण : देवीदास सामसे (भाजप) - ४९५७




Social Plugin