वैजापूरात पोलीसांचा रूट मार्च...

वैजापूर

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलीसांच्यावतीने  ता.३० रोजी रुट मार्च काढण्यात आला. रूट मार्च दरम्यान पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने बंदोबस्त मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाण्यात सूचना दिल्या. तसेच पोलीस ठाण्याच्या कवायत मैदानात जातीय दंगा काबू योजना सराव देखील घेण्यात आला.

शुक्रवारी सकाळी शहरातील बाजारपेठ व मध्यवर्ती भागात वैजापूर पोलीसांनी  रूट मार्च  काढला. यामध्ये ४ अधिकारी व ४१ अंमलदारांचा समावेश होता. याशिवाय तालुक्यातील खंडाळा येथेही रूट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सपोनि विजय देशमुख, पोउपनि युवराज पाडळे, एकनाथ नागरगोजे, आर.आर.जाधव, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे, रणजीत चव्हाण, योगेश झाल्टे, शिवकांता भुरे, रावसाहेब रावते, भगवान सिंघल, प्रशांत गीते, अजित नाचन, पवन सुंदर्डे, किरण रावते व इतर अंमलदार सामील होते. दरम्यान उपविभागात  निवडणूक बंदोबस्तासाठी दंगा काबू पथकासह अधिकारी व कर्मचारी असा एकूण तीनशे पोलीसांचा जंबो फौजफाटा तैनात असणार आहे.