वैजापूर
निवडणूक प्रक्रिये दरम्यान निवडणूक निर्णयाधिकांऱ्याशी हुज्जत घातल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. १९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास येथील पंचायत समिती सभागृहात ही घटना घडली. बाळासाहेब बनसोडे (रा. जामगांव, ता. गंगापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी निवडणूक निर्णयधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक - २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. दरम्यान सोमवारी ते व त्यांच्यासोबत इतर कर्मचारी येथील पंचायत समिती सभागृहात निवडणूक संदर्भाने कामकाज करत होते. दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाळासाहेब बनसोडे नामनिर्देशन कक्षात येऊन त्यांना म्हणाले की, 'तुम्ही आम्हाला आमचे नामनिर्देशनाची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही.' असे म्हणून विनाकारण सभागृहातील कक्षात गोंधळ घालू लागले. तेव्हा डॉ. जऱ्हाड व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगत नामनिर्देशनाची व्यवस्था केलेली असून नामनिर्देशनाची महत्वपुर्ण काम चालु असल्याचे सांगितले. परंतु बनसोडे याने त्यांच्या सोबत अरेरावेची उद्धट भाषा वापरुन त्यांच्या अंगावर धाऊन गेले व समोर असलेली निवडणूक संदर्भाची कागदपत्रे त्यांच्या हातातुन बळजबरीने हिसकावत घेत त्यांना धक्का-बुक्की करुन कागदपत्राचा चुरगळा करुन नामनिर्देशन पत्रांना धोका निर्माण केला. शिवाय बनसोडे जऱ्हाड याना म्हणाला की, 'तुला पाहून घेतो' असे म्हणून धमकी दिली व ते करीत असलेल्या निवडणूक संदर्भातील महत्वपुर्ण शासकीय कामकाज अडथळा निर्माण केला. याशिवाय बनसोडे व त्यांच्यासोबत दोन बाऊंसर (नाव गाव माहित नाही) यांनी १८ जानेवारी रोजी देखील पंचायत समिती सभागृहात निवडणूक संदर्भाने काम करित असलेले तहसिलदार सावंत यांना 'तुम्ही निवडणूक नामनिर्देशन पत्राची किंमत १०० रुपये का ठेवली ?' असे म्हणून त्यांच्यासोबतही गोंधळ घातला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात बाळासाहेब बनसोडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.jpg)

.jpg)
Social Plugin