मकर संक्रातीला 'ज्योत कल्याण पतसंस्थे'च्या वतीने महिलांना रोपटे वाटप



वैजापूर

संक्रांतीच्या सणा निमित्त येथील ज्योत कल्याण पतसंस्थेच्या वतीने महिलांना वाण म्हणून झाडांची रोपटी देऊन सण साजरा करण्यात आला. पतसंस्थेच्या चेअरमन सारिका सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ जानेवारी रोजी महिलांना वाण म्हणून झाडांची रोपटी देऊन मकर संक्रात हा सण साजरा करण्यात आला. 

महिलांना वाण म्हणून देण्यात आलेले रोपटे हे परिसरात वृक्ष लागवड होऊन परिसर हरित व्हावा या उद्देशाने हा सण साजरा करण्यात आला. दरम्यान  या रोपट्यां प्रमाणेच पतसंस्थेने देखील मागील काही वर्षांपासून खातेदारांचा संस्थेवरील विश्वास रुपी रोपटयाचे संगोपन करून याची वटवृक्षासारखी वाढ केली असल्याचे चेअरमन सारिका सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला सचिव सचिन नाईकवाडी, कर्मचारी निखिल नाईकवाडी, महेश आंबेकर, सचिन राजपूत, साक्षी राजपूत, प्रगती गायकवाड, गणेश मापारी यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.