वैजापूर
छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रा.) पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या एकाकडून गांजासह एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. २२ जानेवारी रोजी तालुक्यातील विरगाव फाटा येथे पथकानेही कारवाई केली. याप्रकरणी दादासाहेब मोईन (रा.चिंचडगाव, ता. वैजापूर) याच्याविरुद्ध विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरगाव फाटा येथे गुरुवारी एकजण दुचाकीने गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रा.) पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने माहितीतील ठिकाणी सापळा रचून सायंकाळच्या सुमारास दादासाहेब मोईन याला मोटारसायकल व गांजा असा एकूण एक लाख ५० हजार ८५० रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, स.पो.नि.श्री. पवन इंगळे, पोहे विष्णु गायकवाड, अंगद तिडके, अनिल काळे, महेश बिरुटे व वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी केली.

.jpg)

.jpg)
Social Plugin