वैजापूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रियाज शेख...



वैजापूर 

वैजापूर नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) रियाज शेख यांची निवड करण्यात आली. या पदाच्या निवडीसाठी १६ जानेवारी रोजी  एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 


स्वीकृत नगरसेवक पदी : सेनेचे संजय बोरनारे, भाजपचे प्रशांत कंगले
         प्रकाश चव्हाण यांची निवड

मागील काही दिवसांपासून वैजापूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदांसाठी रस्सीखेच सुरू असल्याने वैजापूरकरांत या निवडीबाबत मोठी उत्सुकता होती.  शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडीसाठी उपनगराध्यक्ष पदासाठी एकूण दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. यात वैजापूर शहर विकास आघाडीच्यावतीने रियाज शेख तर भाजपकडून विशाल संचेती यांनी अर्ज दाखल केला. मात्र भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असल्याने विशाल संचेती यांचा अर्ज अवैध ठरला. यामुळे रियाज शेख यांची निवड झाली. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून  प्रशांत कंगले, प्रकाश चव्हाण, विजय दायमा व वाजेद कुरेशी यांनी  शहर विकास आघाडीकडून इम्रान कुरेशी यांनी तर शिवसेनेच्यावतीने संजय बोरनारे यांचा अर्ज दाखल झाला होता. भाजपचे गटनेते यांनी प्रशांत कंगले व प्रकाश चव्हाण यांच्या नावाची शिफारस तर शिवसेनेचे गटनेते यांनी संजय बोरनारे यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांची निवड करण्यात आली. या निवडी नंतर कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून आनंद साजरा केला.