वैजापूर
पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांच्या ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा 'कमळ' फुलवले. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी ६ हजार २४८ मताधिक्य घेत शिवसेनेचे संजय बोरनारे यांचा पराभव करत वैजापूर शहरात खऱ्या अर्थाने 'धुरंधर' ठरले. दरम्यान काॅंग्रेस आघाडीचे सुभाष गायकवाड यांना केवळ १०४७ मते मिळाली. भाजप मित्रपक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसला नगरसेवकांच्या ४ व शिवसेनेला १० जागा मिळाल्या. वैजापूरकरांनी एकाच घरात सत्ता नाकारात डॉ. परदेशींना कौल दिला.
नगराध्यक्ष पदासह प्रभाग व पक्षनिहाय विजयी उमेदवार :
डॉ. दिनेश परदेशी (भाजप)
नगराध्यक्ष
मिळालेली मते - १८ हजार २८
प्रभाग क्रमांक १
(अ) सुमैय्या बक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
(ब) पारस घाटे (शिवसेना)
प्रभाग क्रमांक २
(अ) मोनाली खैरे (भाजप)
(ब) विशाल संचेती (भाजप)
प्रभाग क्रमांक ३
(अ) पुजा त्रिभुवन (राष्ट्रवादी काँग्रेस)
(ब) रियाज शेख (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक ४
(अ) स्वप्निल जेजुरकर (शिवसेना)
(ब) संगीता राजपूत (भाजप)
प्रभाग क्रमांक ५
(अ) जयश्री चौधरी (शिवसेना)
(ब) साबेर खान (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ६
(अ) दीपा राजपूत (भाजप)
(ब) ताहेर खान (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ७
(अ) राहुल त्रिभुवन (शिवसेना)
(ब) सविता चव्हाण - (भाजप)
प्रभाग क्रमांक ८
(अ) लता वाणी - (भाजप)
(ब) बाबासाहेब पुतळे - (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ९
(अ) अमीर अली - (शिवसेना)
(ब) सुरेखा घाटे - (शिवसेना)
प्रभाग क्रमांक १०
(अ) ज्योती जोशी - (भाजप)
(ब) हमीद कुरेशी - (शिवसेना)
प्रभाग क्रमांक ११
(अ) दशरथ बनकर - (भाजप)
(ब) सुवर्णा ठोंबरे - (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १२
(अ) राजेश गायकवाड - (भाजप)
(ब) जयश्री राजपूत - (भाजप)
(क) कविता शिंदे - (भाजप)


.jpg)
Social Plugin