मुंबई
माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मंचर येथे युवक-युवती मेळाव्यात बोलतांना त्यांनी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या चक्क संभाव्य तारखा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी थेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा सांगितल्या आहेत. नोव्हेंबर ते ३१ जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पूर्ण होण्याचा अंदाज दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. दिलीप वळसे-पाटील हे बोलताना म्हणाले की, मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. परंतु आमच्याकडील माहितीनुसार ५ नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. तर १५ डिसेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर होऊन १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.
.jpeg)
Social Plugin