वैजापूर
एकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली तालुक्यातील जरुळ येथील तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून भास्कर भिकाजी मतसागर, साईनाथ रामराव मतसागर व रामहरी शिवनाथ मतसागर (सर्व रा.जरुळ, ता.वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस भास्कर मतसागर, साईनाथ मतसागर व रामहरी मतसागर या तिघांचा सागर पडवळ यांच्याशी वाद झाला. दरम्यान सागर पडवळ यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत 'त्या' तिघांनी सागर यांना वादादरम्यान जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार वैजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांत अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.jpeg)
Social Plugin