नागरिकांचे गहाळ मोबाईल वैजापूर पोलीसांनी केले परत


वैजापूर

शहर व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणाहुन गहाळ झालेले सुमारे एक लाख रुपये किंमतीचे मोबाईल संच वैजापूर पोलीसांनी मुळ मालकांच्या स्वाधीन केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरिक्षक सत्यजित ताईतवाले यांनी हरवलेले मोबाईल शोध घेण्यासाठी पोलीस हवालदार रावसाहेब रावते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलट, किरण रावते यांना सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सी.ई.आय.आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे नाशिक, मालेगाव, श्रीरामपूर, वैजापूर  तालुक्यातील शिवराई, जरुळ व आघुर याठिकाणाहून हस्ते परहस्ते मोबाईलधारकांशी वारंवार संपर्क करुन सदरची मोहीम राबवली. या मोहिमेतून सुमारे एक लाख रुपये किमतीचे एकूण ६ मोबाईल हस्तगत करण्यात वैजापूर पोलीसांना यश आले. सदरची मोहीम वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सातत्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब रावते, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलट, किरण रावते यांच्या पथकाने केली.