वैजापूर
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त वैजापूर येथे काढण्यात आलेल्या "रन फॉर युनिटी" (राष्ट्रीय एकात्मता दौड) मध्ये वैजापूर शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेचे दर्शन घडवून सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही एकात्मता दौड आरंभ झाली. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. दिनेश परदेशी, दशरथ बनकर, संदीप ठोंबरे,जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी या दौडला ध्वज दाखविला. जवळ पास एक किमी दौड झाल्यावर या ठिकाणी धोंडीराम राजपूत यांनी राष्ट्रीय एकात्मता प्रतिज्ञा दिली व राष्ट्रगीताने समारोप झाला. डॉ.दिनेश परदेशी यांनी पुढील महिन्यापासून विविध समाजिक व राष्ट्रीय उपक्रम घेऊन कार्यक्रम राबविण्यात येतील अशी माहिती यावेळी दिली. या राष्ट्रीय एकात्मता दौडमध्ये डॉ. दिनेश परदेशी, दशरथ बनकर, संदीप ठोंबरे यांच्या स्मवेत प्रशांत कंगले, गौरव दौडे,महेश भालेराव,गणेश खैरे,राजेश गायकवाड, अनिता तांबे,सुरेश तांबे,साबेर शेख,सुरेखा बागुल,नीता पाटील,गिरीश चापानेरकर,शैलेश पोंदे,जवाहर कोठारी, गणेश खैरे,ज्ञानेश्वर अदमाने, गोकुळ भुजबळ, सुभाष गोमलाडू, ज्ञानेश्वर सिरसाट, वैशाली शेलार, किरण व्यवहारे यांच्यासह शहरातील सर्व थरातील नागरिक विद्यार्थी, शिक्षक व जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.



.jpg)
Social Plugin