लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने वैजापूरात जनजागृती...

 



वैजापूर
बहुतेक शासकीय कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचारावर तोडगा काढून प्रशासकीय यंत्रणा पारदर्शक व नीतिमान करण्यासाठी छञपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर  या कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. 


या सप्ताहाच्या अनुषंगाने २९ ऑक्टोबर रोजी वैजापूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी  विभागाकडून जनजागृती करण्यात आली. छञपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, पोहेकॉ रवींद्र काळे, आत्माराम पैठणकर आदींच्या पथकाने वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालय, पोलिस ठाणे, नगरपालिका, बसस्थानक, बाजारतळ, मुख्य बाजारपेठ परिसरात समक्ष जाऊन कार्यालयातील  परिसरात भेटलेल्या नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप करून लाच घेणे किंवा देणे या विषयी सविस्तर माहिती सांगितली. याशिवाय छञपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाचे टेलिफोन क्रमांक, टोल फ्रि क्रमांक, वेब साईट, ई-मेल आयडी इत्यादीची माहिती दर्शविणारे भित्तीपत्रके देखील पथकाच्यावतीने वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आले.