वैजापूर
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून साथी पोर्टल-२ च्या वापराची सक्ती राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना केली आहे. परंतु या पोर्टलला विरोध दर्शवून विक्रेत्यांच्या भावनांकडे कृषी विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व कृषी निविष्ठां विक्रेत्यांनी मंगळवार (ता. २८) खरेदी व विक्री बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातील कृषी निविष्ठा केंद्र चालकांनी देखील या बंद मध्ये सहभाग नोंदवला. दरम्यान व्यवसाय जरी बंद ठेवला तरी आपली सामाजिक बांधिलकी जपत 'वैजापूर कृषी निविष्ठा विक्रेता' संघटनेच्यावतीने येथील महादेव मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला आमदार रमेश बोरनारे व डॉ. दिनेश परदेशी यांनी देखील भेट देत संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
शिबिराच्या सुरुवातीला जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, डॉ.हेडगेवार बँकेचे चेअरमन प्रशांत कंगले, कृषी साहित्य विक्री संघटनेचे अभिजित सोनी, प्रशांत पवार,परिमल पोंदे,संजय गागरे यांच्या उपस्थितीत रक्तदानास सुरुवात झाली.अभिजित सोनी, परिमल पोंदे, रविंद्र जेजुरकर, मुकुंद चव्हाण,बाळासाहेब मतसागर,भरत गायकवाड,परेश कोठारी, अशोक पवार (आप्पा) खंडाळकर व इतर सर्व कृषी साहित्य विक्रेते व्यापारी यांनी आजच्या या संपादरम्यान वेळेचा अपव्यय टाळून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. दरम्यान संघटनेच्या या उपक्रमाचे आमदार रमेश बोरनारे व डॉ. दिनेश परदेशी यांनी देखील कौतुक केले. छत्रपती संभाजीनगर येथील दत्ताजी भाले रक्तपेढी संकलन केंद्राद्वारे रक्त संकलित केले. रक्तपेढीचे डॉ.अमर सातपुते, आप्पासाहेब सोमासे, गजानन वाघ, गौरव गुट्टे, राधा पठाडे, मंजुषा शेळके यांनी रक्त संकलित करून सहकार्य केले.



.jpg)
.jpg)
Social Plugin