वैजापूरात शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती साजरी

वैजापूर 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक रत्नापैकी अत्यंत प्रामाणिक व निष्ठावंत रत्न जिवाजी महाले यांचे बलिदान संपूर्ण राज्य कधीही विसरू शकणार नाही असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष शिल्पा(ताई) परदेशी यांनी शिवरत्न जिवाजी महाले यांच्या ३९० व्या जयंती निमित्त जिवाजी महाले स्मारक येथे त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना गुरुवार ता.०९ रोजी केले.

"शिव-फुले-शाहू-आंबेडकर "जयंती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिल्पा(ताई) परदेशी बोलत होत्या.या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अकिल शेख, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, राजेश गायकवाड ,दिनेश राजपूत ,योगेश गाढे यांनी ही जिवाजी महाले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी  दिलीप अनर्थे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बाबासाहेब गायकवाड,आबा जेजुकर, जगन गायकवाड, सुनील घोलप, डॉ.ईश्वर अग्रवाल, सुधाकर आहेर,रमेश तोडकर,देविदास अनर्थे, रणजित मथुरिया,दिलीप विश्वासू,सचिन लाडवणी, वीरेंद्र मगर,चंद्रकांत व वरुण अनर्थे,योगिता गाढे,सुनील घोलप,भास्कर खरात,देविदास जाधव,सुनंदी बोथरा कल्पेश शेटे यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.धोंडीराम ठाकूर यांनी सूत्रसंचलन केले. दिलीप अनर्थे व जगन गायकवाड यांनी नियोजन केले.