वैजापर
तालुक्यातील शिऊर येथील शिवपुरी मंगलकार्यलयासमोर ०३ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन एकजण जागीच ठार झाला. मदनसिंग तानासिंग ठाकूर (वय ५०, रा.हाजीपूरवाडी) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे तर सुनील जोशी (रा. हतनूर, ता, कन्नड) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
मृत :मदनसिंग ठाकूर
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनसिंग ठाकूर हे बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच-२० एफएस-५७६९) वैजापूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी वैजापूरकडून शिऊर (बं) कडे येणाऱ्या दुचाकीने (एमएच-२० जीटी-६००४) त्यांच्या मोटार सायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मदनसिंग ठाकूर हे जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील बाळू जोशी हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दोघांना तातडीने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मदनसिंग ठाकूर यांना मृत घोषित केले. दरम्यान सुनील जोशी यांना गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. शिऊर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करित आहेत.

Social Plugin