लोणी महसूल मंडळात सर्वाधिक १०३३ मिमी पर्जन्यमान..
वैजापूर
यंदा तालुक्यात शेवटच्या टप्प्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्व मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मागील आठडाभरापूर्वी पावसाने शहरासह ग्रामीण भागात कहर केल्याने शेतीमालाचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.
यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यँत वैजापूर तालुक्यातील सर्व महसूल मंडळात एकूण ३४२ मिलिमीटर अर्थातच पिकांसाठी जेमतेम इतकाच पाऊस झाला. त्यावेळी तालुक्यातील बहुतेक प्रकल्प कोरडीठाक होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने सर्व प्रकल्प तुडुंब भरले. ऑगस्ट महिन्यापर्यँत झालेल्या जेमतेम पावसाने सप्टेंबर महिन्यात मात्र तुफान बँटिंग करत ७३३ मिलीमीटरचा पल्ला गाठला. अर्थात या महिन्यातील शेवटच्या काही दिवसांत तालुक्यात ३९१ मिलिमीटर म्हणजेच तीन महिन्यात झालेल्या एकूण पावसाच्या दुपट्टीपेक्षा अधिकचा पाऊस झाला. या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शेतीमालाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात सर्वाधिक लोणी महसुल मंडळात १०२२ मिलिमीटर तर सर्वात कमी बाबतारा महसुल मंडळात १९२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. दरम्यान राज्यशासनाकडून येत्या दोन ते तीन दिवसांत मोठ्या मदतीची घोषणा होणार असल्याची माहिती जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान ही मदत हाती येईपर्यंत दिवाळी उजडणार हे मात्र नक्की !
तालुक्यातील १२ महसुल मंडळाची पावसाची वार्षिक सरासरी ५४९ मिलिमीटर असून मात्र यावर्षी जून ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान तालुक्यात एकूण ७३३ मिलिमीटर पाऊस बरसला.
वैजापूर तालुक्यातील १२ महसुल मंडळात जून ते सप्टेंबर (२०२५) या कालावधीत झालेल्या पावसाची आकडेवारी खालील प्रमाणे :
वैजापूर - ७७५.३ मिलीमीटर
खंडाळा - ७०६.० मिलीमीटर
शिऊर - ८३५.४ मिलीमीटर
बोरसर - ६४२.० मिलीमीटर
लोणी - १०२२.३ मिलीमीटर
गारज - ९१९.५ मिलीमीटर
लासुरगाव - ८३३.० मिलीमीटर
महालगाव - ६६५.२ मिलीमीटर
नागमठाण - ६०८.३ मिलीमीटर
घायगाव - ६७९.५ मिलीमीटर
जानेफळ - ७७०.१ मिलीमीटर
एकूण - ७३३.५ मिलीमीटर
.jpeg)
Social Plugin