ढेकू नदीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यु...

तालुक्यातील राहेगाव शिवारातील घटना

वैजापूर

तालुक्यातील राहेगाव शिवारातील ढेकू नदीत शनिवार (ता.०४) रोजी सकाळी तीन तरुण पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत वाहू लागले. यातील दोघे बाहेर पडले. परंतु एकजण मात्र नदीतपात्रात बुडाला. अजय पांडुरंग बोरकर (२२, रा. राहेगाव, वैजापूर) असे नदीत बुडाल्याचे नाव आहे.


मृत : अजय बोरकर

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथील ढेकू नदीच्या पात्रात अजय पांडुरंग बोरकर (२२) अक्षय बाळू शेलार (२५) व ओम सतीश बोरकर (२०) हे तिघेजण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत वाहू लागले. यावेळी अक्षय शेलार व ओम बोरकर हे पाण्यातून बाहेर निघाले. मात्र अजय बोरकर याला पाण्याचा अंदाज आल्याने तो पाण्यात वाहून गेला. बाहेर पडलेल्या दोघांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. याठिकाणी छञपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पथकातील जवानांच्या अथक परिश्रमानंतर अजय बोरकर याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.