वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वैजापूर
शहरातील तुळसाईनगर परिसरातून एका घरासमोरून अशोक लेलँड कंपनीचे वाहन चोरी गेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम हुसेन कुरेशी हे वैजापूर शहरातील खान गल्ली परिसरात रहिवासास आहेत. त्यांच्याकडे अशोक लेलॅन्ड कंपनीचे वाहन (एमएच २०ईजी ५४०२) असून ते वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान घराजवळ गाडी लावण्यासाठी जागा नसल्याने ते तुळसाईनगर परिसरात रहिवासास असलेल्या त्यांच्या भावाच्या घरासमोर गाडी लावतात. १६ सप्टेंबर रोजी ते तुळसाईनगर येथे गाडीकडे चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना गाडी दिसून आली नाही. यावेळी त्यांना कळून आले की १५ सप्टेंबर पर्यँत गाडी त्याचठिकाणी उभी होती. मात्र मध्यरात्री गाडी चोरी गेली. त्यांनी परिसरात व आजूबाजूच्या जिल्ह्यात वाहनाचा शोधाशोध केला. परंतु वाहन मिळुन आले नाही. याप्रकरणी सलीम कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे ९५ हजार रुपये किंमतीचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन चोरी गेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.jpeg)
Social Plugin