शेततळ्याच्या साहित्याची चोरी..

वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारातील घटना
वैजापूर
तालुक्यातील बेलगाव शिवारात शेततळ्याच्या कामावरून १४ हजार रुपयांचे साहित्य चोरी गेल्याची घटना ०१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर दिपकसिंग राजपुत  (रा.आधुर, ता.वैजापुर) यांचे तालुक्यातील बेलगाव शिवारात शेत गट क्रमांक १०४ मध्ये चार एकर शेतजमीन आहे. त्यांच्या शेतात शेततळे असून सध्या शेततळ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्ती दरम्यान तळ्याच्या सभोवतालच्या लोखंडी तारा व लोखंडी अँगल काढून ठेवले होते. दरम्यान अमोल शिंदे यांनी हे शेत बटाईने धरले आहे. ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता बटाईदार अमोल याने मयूर राजपूत यांना फोनवर संपर्क करून कळविले की, लोखंडी ताराच्या जाळ्या व लोखंडी अँगल कुणीतरी चोरून नेले आहे. ही माहिती मिळताच मयूर यांनी शेतात जाऊन बघितले असता १२ हजार रुपये किंमतीची लोखंडी जाळी व २ हजार रुपये किंमतीचे अँगल असे एकूण १४ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी गेल्याचे त्यांना दिसून आले. मयूर राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.